दीपोत्सवाची सर्वजण वाट पाहत आहेत. बाजारपेठा सुद्धा विविध सजावटीच्या साहित्याने आकाश दिव्यांनी फुललेल्या आहेत सर्वत्र धामधूम चालू आहे. अशातच महाराष्ट्रावर पुराचं संकट येऊन गेल्याने उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे कित्येक कुटुंब उध्वस्त झालेले असताना आपण पूरग्रस्तांसाठी निधी जमा करावा अशीच सामाजिक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या दृष्टीने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने पणत्या रंगवून त्याच्या विक्रीतून जमा झालेला निधी पूरग्रस्तांसाठी मदत निधी म्हणून पाठविण्यात आला .तसेच देशाच्या संरक्षणासाठी सैनिक सदैव तत्पर असतात. सणासाठी सुद्धा घरी न जाता त्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. सैनिकांमुळेच आपण सुरक्षितपणे सण साजरे करू शकतो यामुळे सीमेवरील सैनिकांना सुद्धा या निधीतून दिवाळी फराळ आणि स्वतः तयार केलेले शुभेच्छा कार्ड पाठविण्यात आले . माननीय मुख्याध्यापिका सौ.सुनंदा सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेच्या संस्था अध्यक्षा माननीय डॉक्टर सौ. तृप्तीजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून तसेच शाळा संचालिका माननीय श्रीम . मधु शितोळे यांच्या मार्गदर्शनातून उपक्रम पार पडला.