MHS-विश्वकर्मा ज्युनिअर कॉलेजमध्ये भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

बंधमैत्रीचे

रविवार दि.१४ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा विद्यालय ज्युनियर कॉलेज दुपार विभागाची शाळा सकाळी ११  वाजता भरविण्यात आली. सुट्टीच्या दिवशीची ही शाळा ,माजी विद्यार्थ्यांना एक अनोखी पर्वणीच ठरली.शाळेची घंटा वाजल्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा व प्रार्थना व परिपाठ झाला.अनेक माजी विद्यार्थी आयोजित वर्गात येऊ लागले. विषयवार तासिकेच्या वेळापत्रकाला  अनुसरून विद्यालयाची ओळख, बदलत्या भौतिक व शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी व शिक्षक मनोगत, आभार प्रदर्शन पार पडले.

       शै.वर्ष २००३ ते २०२५ या कालखंडातील विविध विद्यार्थी आपल्याबरोबर आठवणींची शिदोरी घेऊन आले. मनोगतामध्ये शब्दांची कमतरता व अनुभवाचे भांडार असा जणू एक सोहळाच भासला. विद्यालयाप्रती असलेली निष्ठा, शिक्षकांच्या विषयी असलेला आदर ,व सहकाऱ्यांच्या विषयी त्यांचे असलेली मैत्री संवादातून जाणवत होती.

      आपल्याच छोट्या भावंडांना एक चांगली बैठक व्यवस्था मिळावी म्हणून मोठ्या सतरंज्या कॉलेजला भेट देत, सर्वांनी अल्पोपहाराचा आनंद लुटला. साहजिकच त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षण, सामाजिक उपक्रम सहभाग, नोकरीचे ठिकाण, व्यवसायाचे क्षेत्र याची सर्वांना ओळख करून दिली.

       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मुख्याध्यापक श्री. प्रमोद नेमाडे यांनी भूषवले त्याचप्रमाणे  मा. मुख्याध्यापक जाधव सर, मुख्याध्यापिका मा. सरडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षिका सौ.वाडेकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

दिवसभराच्या आठवणी फोटोमध्ये साठवत ,पुन्हा असाच भेटीचा योग येऊ दे, अशी इच्छा मनात ठेवून कार्यक्रमाचा समारोप झाला

Leave a Reply