शालेय परिसरात फुलणार परसबाग

आनंददायी शनिवार अंतर्गत विद्यालयात विविध उपक्रमांचे ,कृतींचे आयोजन करण्यात येते. कृतीयुक्त आनंददायी शिक्षणाचा अनुभव दर शनिवारी विद्यार्थी घेत आहेत. या अंतर्गतच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात परसबाग करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. परसबागेसाठी विविध बिया जमवणं,  माती आणि कोकोपीट ,शेणखत इत्यादी गोष्टींची पूर्वतयारी केली. विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न पडतात.  बीया रूजवायच्या कशा, बियांची साठवण म्हणजे काय ,बिया कशा प्रकारच्या असतात, नैसर्गिक खते म्हणजे काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तर विद्यार्थ्यांना स्वतःहून या उपक्रमाद्वारे मिळणार आहेत. विद्यार्थी केवळ बियांची रुजवण करून थांबणार नाहीत तर त्याचा रोप तयार होण्याचा प्रवास स्वतः अनुभवणार आहेत .परसबागेसाठी विद्यार्थ्यांनी स्वतः सूचना पाट्या तयार केल्या.एका उपक्रमातून अनेक उद्दिष्टे साध्य झाली खरंतर भाज्यांची वाढ होऊन त्याला फळ लागल्यानंतर चा आनंद हा अनोखाच असणार आहे.  सदरील उपक्रम वर्गशिक्षिका सौ.सत्यवती कांबळे व कुमारी सुनीता पाटील ,तसेच श्रीयुत शुभम किराड आणि शिपाई राजू काका, प्रवीण काका यांच्या प्रयत्नातून  पूर्ण होत आहे. शालेय अध्यक्षा माननीय डॉक्टर तृप्तीजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि माननीय संचालिका श्रीम