विश्वकर्मा विद्यालय मराठी माध्यम बिबवेवाडी पुणे क्रीडा महोत्सव 2025- 26

क्रीडादिनी आशियाई सुवर्णपदक विजेते माननीय सुजय तनपुरे यांची उपस्थिती

     🏆🏅🏃‍♀️🏃‍♂️🏅🏆

रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा झाला . इयत्ता बालवाडी ,पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा एक दिवसीय क्रीडा महोत्सव पार पडला क्रीडा मुहूर्त वा त्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र केसरी आशियाई सुवर्णपदक विजेते माननीय सुजय नागनाथ तनपुरे यांच्या उपस्थितीत रंगीत फुगे आकाशात सोडून, क्रीडा ज्योत पेटवून भूमिपूजन करून विद्यार्थी संचलनाद्वारे मानवंदना स्वीकारून विविध खेळांना सुरुवात झाली आपल्या उद्घाटनिय भाषणात तनपुरे यांनी आपल्या स्वतःच्या परिचयात शेतकऱ्याचा मुलगा हा काबाडकष्ट करून ध्येय ठरवून उत्तुंग यश प्राप्त करू शकतो देशाचं नाव उज्वल करू शकतो  हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला संपूर्ण बालचमू त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रेरित झाले आणि मैदान गाजवायला सज्ज झाले. दोरीवरच्या उड्या, बुक बॅलन्सिंग ,रिंग पासिंग बटाटा शर्यत इत्यादी वैयक्तिक खेळ घेण्यात आले .तर खोखो, कबड्डी, लंगडी, डॉजबॉल इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले. सर्वच विद्यार्थ्यांना खेळण्याची संधी मिळेल याचा प्रयत्न करण्यात आला. या वर्षाचा विशेष क्रीडा प्रकार म्हणजे मुला मुलींची एकत्रितपणे क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली आणि मुलींनी सुद्धा आम्ही सुद्धा मुलांच्या बरोबरीने खेळू शकतो हे आपल्या खेळातून दाखवून दिले. अतिशय चुरशीचा सामना क्रिकेटचा झाला. स्पर्धा संपल्यानंतर सन्मानपूर्वक क्रीडा ध्वज खाली उतरविण्यात आला. क्रीडा महोत्सवाचे संपूर्ण नियोजन क्रीडा समिती प्रमुख श्री.भाऊ कोकाटे, निर्मला हुचगोळ श्री. एकनाथ माळी व श्री.मनोज महाजन यांच्या मार्गदर्शना खाली सर्व शिक्षक वृंद, शिपाई कर्मचारी ,विद्यार्थी स्वयंसेवक सर्व बालचमू यांनी पार पाडला. शाळेच्या अध्यक्षा मा. डॉक्टर सौ तृप्तीजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि शालेय संचालिका माननीय श्रीमती मधु शितोळे व मुख्याध्यापक माननीय श्री जाधव सर व सुनंदा सरडे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली क्रीडा महोत्सव संपन्न झाला*.

Leave a Reply