ज्ञानाचा सागर म्हणजे विश्वकर्मा!
माझ्या तिन्ही मुली याच शाळेत शिक्षण घेतात. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी याच परिसरात लहानाची मोठे झाल्यामुळे इतर शाळा आणि विश्वकर्मा विद्यालय ही शाळा यातील फरक मला माहिती आहे. त्यामुळे मुलींना विश्वकर्मा शाळेत शिक्षण देण्याचा निर्णय मी व माझ्या मिस्टरांनी घेतला. मुलींना फक्त प्रथेप्रमाणे शिक्षण न देण्याचा आमचा निर्णय विश्वकर्मा शाळेने सार्थ करून दाखवला.
मला येथील शिक्षण पद्धती फार आवडते. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एसीरूममध्ये बसून शिक्षण देण्यापेक्षा मातीच्या ढिगार्यावर,मैदानावर प्रात्यक्षिक स्वरूपात शिक्षण देण्याचा आमची शाळा नेहमीच तत्पर असते. मुलांना देशाचा सुजाण नागरिक होण्यासाठी जे प्रयत्न शाळा करत आहे, ते मी स्वतः अनुभवले आहेत. अनुभवी व गुणसंपन्न शिक्षक वृंद व आम्हाला प्रेमळपणे मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका सौ.सुनंदा सरडे मॅडम व विश्वकर्मा चारिटेबल ट्रस्टची मी नेहमी आभारी राहील.
ज्ञानाचा सागर म्हणजे विश्वकर्मा,
संस्कारांचा गोड झरा म्हणजे विश्वकर्मा,
व्यक्तिमत्व विकासाचे वेगळेपण म्हणजे विश्वकर्मा,
मौत मस्तीचा वेगळा थाट म्हणजे विश्वकर्मा…
मी सौ. रुपाली राजेंद्र कुळे. माझी मुलगी कु. पूर्वा कुळे इयत्ता सहावी अ मध्ये शिकत आहे. शाळेत सर्व भौतिक सुविधा आहेत त्याचबरोबर विश्वकर्मा शाळेत खूप उपक्रम राबवले जातात. या शाळेतील सर्व शिक्षक खूप चांगले आहेत आणि ते उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवतात. शाळेत शिक्षणाच्या व खेळाच्या सर्व सुविधा आहेत. त्याचा माझी मुलगी लाभ घेते त्यामुळे तिच्या प्रगतीत वाढ झाली आहे. विश्वकर्मा शाळेत बाह्य स्पर्धा व परीक्षा ही घेतल्या जातात. विश्वकर्मा शाळेत रोबोटिक्स लॅब, अँकरिंग क्लब, टॅब बडी, निसर्ग मित्र प्रोजेक्ट तसेच विज्ञान प्रदर्शन या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती होत आहे आणि त्याचा भविष्यातही फायदा होणार आहे. या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान आहे. प्रत्येक वर्गात ई-लर्निंग व सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.या शाळेतील सर्व वर्ग खूप स्वच्छ आहेत आणि या स्वच्छतेमुळे मला विश्वकर्मा शाळा खूप आवडते. माझी मुलगी विश्वकर्मा अशा उत्तम आणि शिस्तबद्ध शाळेमध्ये शिकत आहे याचा मला खूप अभिमान आहे.
विश्वकर्मा विद्यालय मराठी प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि माहिती मिळवण्याचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. या शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात, ज्यामुळे त्यांच्यात व्यक्तिमत्त्व विकास होतो आणि ते चांगल्या प्रकारे विचार करू शकतात. जशी प्रत्येक शाळा विद्यार्थ्यांना आपले घर वाटते, तशीच ही शाळा माझ्या मुलीला तिचे घर वाटते. तिला घरात राहण्यापेक्षा शाळेत राहायला आवडते.
आमच्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जसे की; पिण्याच्या पाण्याचे फिल्टर, स्वच्छ शौचालय,सी.सी.टी.व्ही कॅमेरे, इ. संगणक कक्ष व रोबोटिक्स लॅब सुरू करून शाळा विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञाना बाबतच्या ज्ञानात भर पाडण्याचा शाळा सतत प्रयत्न करत आहे. तसेच शाळेत टॅप बडी, निसर्ग मित्र ऑलिंपियाड,व इतर बाह्य स्पर्धा परीक्षा असे अनेक उपक्रम राबविले जातात.आमच्या शाळेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ; ज्यामुळे मुलांच्या कला-गुणांना वाव मिळतो. सामाजिक बांधिलकी म्हणून दर रविवारी शाळेतील इयत्ता ७ वी चे विद्यार्थी ‘उमेद केअर सेंटर’ येथे वृद्ध आजी-आजोबांना भेटण्यासाठी जातात.
माझी मुलगी अशा अभिमानास्पद शाळेत शिकते याचा मला गर्व वाटतो. अशाच छोट्या मोठ्या गोष्टींतून आमची शाळा प्रगती करत राहिल याची मला खात्री आहे.
शालेय उपक्रमात सक्रिय सहभाग म्हणून आदर्श पालक यासाठी माझी निवड करून सन्मानपूर्वक बक्षीस दिले त्याबद्दल मी विश्वकर्मा शाळेची नेहमी ऋणी राहील.
माझी दोन्ही मुलं शिशुगटापासून या शाळेमध्ये शिकत आहेत. सर्वप्रथम शाळेची आवडलेली भौतिक सुविधा म्हणजे प्रशस्त इमारत. या प्रांगणात अध्यापनाचे काम करणारे शिक्षकांना शतशः नमन त्यांच्या अथक परिश्रमामुळे आमची मुलं अनेक चांगल्या गोष्टीने सन्मानित होत आहेत. भविष्यामध्ये या शाळेने रचलेला पाया मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शाळेने घालून दिलेले नियम नक्कीच मार्गदर्शक ठरतील. भविष्यात आमची मुलं उंच भरारी घेताना शाळेचे नाव हे उज्ज्वल होईल याचं पालक म्हणून शाळेला आश्वासन देते.
आमची शाळा खूप छान आहे. माझा मुलगा व मुलगी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचे नाव विश्वकर्मा विद्यालय आहे. शाळेत खूप छान मुलांना शिकवत असतात. शाळेत मुले आनंदाने जातात. आमच्या शाळेत खूप छान सुविधा आहेत. जसे ; कॉम्प्युटर लॅब, रोबोटिक्स लॅब , बायोलॉजी लॅब, इत्यादी.
आता तर प्रत्येक वर्गात नवीन स्मार्ट टीव्ही बसवण्यात आलेत. या शाळेत मुलांना एकत्र घेऊन शिकवले जाते. ज्यांना अभ्यासाचे जमत नाही त्यांना अधिकाधिक वेळ देऊन जादा तास घेऊन त्यांच्यातील कमी दूर करतात. आमच्या शाळेत बाह्य स्पर्धा खूप राबवल्या जातात. जसे ;चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा. तसे तर त्या स्ट्रीट आहेत पण तेवढ्याच प्रेमळ व मुलांना समजून घेतात.