दिनांक 15/6/26 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी रोबोट व मोबाईलचा वेश परिधान करून सर्व वर्गात जाऊन AI चे महत्त्व व मोबाईलअधिक प्रमाणात वापरण्याचे दुष्परिणाम याविषयी जागरूकता केली. यावर्षी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्व वर्गात जाऊन चांगल्या सवयींचे महत्त्व व अभ्यास करण्याची पद्धत याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले .

