मराठी प्राथमिक विद्यालयात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत परिसरात फेरी काढली. प्रत्यक्ष वारकऱ्यांना शाळेमध्ये बोलावून इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीतून त्यांचे कार्य जाणून घेतले व त्यांना काही भेटवस्तू दिल्या. शाळेतील गीतमंचाने परिसरातील विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन भजन सेवा केली.

