आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग दिन साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व समजण्यासाठी प्रत्येक वर्गातून योगाभ्यास घेण्यात आला . “शरीर माध्यम खलु धर्मसाधनम” या उक्तीप्रमाणे सुंदर शरीरात सुंदर मन वास्तव्य करते यासाठी योगाभ्यास करणे महत्त्वाचा आहे . भारतीय संस्कृतीत असलेले योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले. योग साधनेमुळे आपले शरीर बळकट तर होतेच शिवाय आपले मन सुद्धा प्रसन्न राहते याची प्रचिती येण्यासाठी योग साधना ध्यानधारणा विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची आसने , सूर्यनमस्कार करून घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही दररोज सूर्यनमस्कार व योगासन करू असे आश्वासन दिले. सदरील उपक्रमात मराठी माध्यमातील इयत्ता पहिली ते दहावी, विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.